Latest NewsPune

पुण्यात मित्रानेच मित्राला संपवलं! दारूच्या नशेतून झालेल्या वादातून हत्या

पुणे : मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. उंड्री हांडेवाडी रस्त्यावर (Undri Handewadi Road) दारूच्या नशेतून झालेल्या वादानंतर एका मित्रानेच दुसऱ्या मित्राची हत्या (murder) केली. विशेष म्हणजे, आरोपीने स्वतःच पोलिसांना (Pune Police) फोन करून हत्येची खोटी माहिती दिली, पण पोलिसांनी अवघ्या दोन तासांत त्याला बेड्या ठोकल्या.

नक्की काय घडलं?
रविकुमार शिवशंकर यादव (वय ३०) या तरुणाची हत्या झाली आहे. त्याचा मित्र किसन राजमंगल शहा यानेच हा खून केला आहे. किसनने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने ११२ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून सांगितले की, चार अनोळखी व्यक्तींनी रविकुमारला मारहाण केली आहे. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केल्यावर त्यांना अनेक गोष्टी संशयास्पद वाटल्या.

पोलिसांच्या तपासात सत्य समोर
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, पण त्यात चार अनोळखी व्यक्तींची कोणतीही हालचाल दिसली नाही. तसेच, स्थानिक रहिवाशांशी बोलल्यावर त्यांना समजले की, रविकुमार आणि किसन यांच्यात अनेकदा वाद होत होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी किसन शहा याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच किसनने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, दारूच्या नशेत असताना रविकुमारने त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. याच रागातून त्याने रविकुमारची हत्या केली. पोलिसांनी किसन शहा याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मित्रामार्फत मिळालेली खोटी माहिती आणि पोलिसांची सतर्कता यामुळे या गुन्ह्याचा लवकर उलगडा झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button