Amaravti GraminLatest News

पंढरपूर वारीनिमित्त IES स्कूलची ‘विठ्ठल दिंडी’ परतवाड्यात उत्साहात पार

परतवाडा : परतवाड्यातील IES गर्ल्स अ‍ॅण्ड बॉईज हायस्कूलतर्फे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ‘विठ्ठल दिंडी’चे भव्य आयोजन करण्यात आले. परंपरागत पोशाखात विद्यार्थी आणि शिक्षकांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषात शाळेपासून परतवाड्यातील विठ्ठल मंदिरापर्यंत पायी दिंडी काढली.

या विशेष उपक्रमाचे नेतृत्व मुख्याध्यापिका सौ. मु-हेकर मॅडम यांनी केले. यामध्ये पर्यवेक्षक श्री. राणे सर, तसेच संयोजक वाटाणे सर यांच्यासह आगे सर, सेंगर सर, उईके सर, पांडे सर, मोहोड मॅडम, करकरे मॅडम, देशपांडे मॅडम, कडू मॅडम, सुरजुसे मॅडम, कोमेरवार मॅडम, हिंडवे मॅडम, तनपुरे मॅडम, गोहत्रे मॅडम व अन्य शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

दिंडी दरम्यान विद्यार्थ्यांनी हरिनाम संकीर्तन, भजन आणि टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी सोहळा पार पाडला. या उपक्रमामुळे परिसरात भक्तिपूर्ण आणि पवित्र वातावरण निर्माण झाले होते.

या आगळ्यावेगळ्या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमाबद्दल IES संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत संजयजी पांगारकर, सचिव श्रीमती रश्मीताई पांगारकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत अभिनंदन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button