रविनगर रस्त्यावरील होर्डींग काढण्याची मनपाने केली कार्यवाही
अमरावती : फ्लेक्स, बॅनर, होर्डींग वर मुद्रक व प्रकाशकाचे नाव टाकणे अनिवार्य आहे तसेच बाजार व परवाना विभाग, महानगरपालिका यांची परवानगी घेणे अनिवार्य आहे. अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, होर्डींग असल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. शहरातील फ्लेक्स, बॅनर, होर्डींग काढण्याची धडक कारवाई करण्याचे स्पष्ट ताकीद देण्यात आली. होर्डींगची स्टॅबलीटी तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जे होंर्डीग अनधिकृत ठरत असेल ते काढण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले होते. बाजार व परवाना विभागाच्या होर्डीगबाबत ज्या अटी आहे जे पुर्ण करतील त्यांना होंर्डीगचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे. बाजार व परवाना विभाग व अतिक्रमण विभाग यांनी अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, होर्डींग काढण्याचे कारवाई निरंतर सुरु ठेवावी अशा स्पष्ट सुचना देण्यात आल्या होत्या.
कोणीही अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, होर्डींग शहरात लावू नये अन्यथा संबंधीतांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
मनपा आयुक्त यांच्या आदेशानुसार आज दिनांक ३० जुन,२०२५ रोजी जेसीबीद्वारे रविनगर रस्त्यावरील अनधिकृत फलक हटविण्याची कार्यवाही करण्यात आली. त्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिका अतिक्रमण विभागाने लगेचच तत्पर कार्यवाही सुरु करुन बाजार परवाना विभागाकडून परवानाधारक होर्डींगची माहिती प्राप्त करुन घेत अनधिकृत होर्डींग हटविण्याच्या कार्यवाहीला तत्परतेने सुरुवात केली.
अनधिकृत फलक हटविण्याची कारवाई बाजार व परवाना विभागाचे कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी केली.



