AmravatiLatest News

विना शिक्षक व विना प्राचार्य असलेल्या 49 महाविद्यालयांत शैक्षणिक प्रथम वर्ष प्रवेशावर बंदी

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचा महत्वपूर्ण निर्णय

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने शैक्षणिक सत्र 2025-266 मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेवू इच्छिणा­या विद्याथ्र्यांना सूचित करण्यात येते की, नुकत्याच संपन्न झालेल्या विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सभेत सन्माननीय सदस्य डॉ.आर.डी. सिकची यांनी विना शिक्षक व विना प्राचार्य असलेल्या 49 महाविद्यालयांत शैक्षणिक सत्र 2025-26 पासून प्रथम वर्ष प्रवेशावर बंदी घालण्यासंदर्भात मुद्दा मांडला होता, त्यानुषंगाने 49 महाविद्यालयांचे शैक्षणिक सत्र 2025-26 पासून प्रथम वर्षाचे प्रवेश थांबविण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला. प्रवेश बंदी घालण्यात आलेल्या 49 महाविद्यालयांची यादी विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर महाविद्यालयीन विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.

            तरी प्रवेश घेवू इच्छिणा­या सर्व संबंधित विद्यार्थी व पालकांना विद्यापीठाच्यावतीने सूचित करण्यात येते की, विना शिक्षक व विना प्राचार्य असलेल्या 49 महाविद्यालयांत प्रथम वर्षाला कोणीही प्रवेश घेवू नये.  बंदी घातलेल्या महाविद्यालयांत विद्याथ्र्यांनी प्रवेश घेतल्यास त्यास विद्यापीठ जबाबदार राहणार नाही, त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या विद्याथ्र्यांची व पालकांची राहील, असे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी विद्यापीठाच्यावतीने कळविले आहे.  अधिक माहितीसाठी महाविद्यालयीन विभागाच्या सहा. कुलसचिव डॉ. साक्षी ठाकूर यांचेशी संपर्क साधता येईल.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button