केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचा बारावी निकाल 98.29%

अमरावती : बारावी हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं वळण असतं. या टप्प्यावर यश मिळवण्यासाठी विद्यार्थी वर्षभर मेहनत करतात. आज सोमवार, ५ मे रोजी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात अमरावती विभागाचा एकूण निकाल 91.43% लागला असून, अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचा निकाल यंदा 98.29% लागला आहे. विशेष म्हणजे वाणिज्य शाखेतील विद्यार्थी यश प्रभुदास खालोकर याने 97% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
यशाचा सन्मान, प्रेरणादायी संदेश
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार भांगडिया यांनी यश खालोकरचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यशने मिळवलेल्या या यशासाठी पूर्ण श्रेय आपल्या महाविद्यालयातील शिक्षक, मार्गदर्शन व शिस्तबद्ध वातावरणाला दिले.
अपयश आलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना यश म्हणाला, “अपयश हेच यशाची पहिली पायरी असते… हार मानू नका, पुढच्या संधींसाठी तयारी सुरू ठेवा.”



