AmravatiLatest News

बडनेऱ्यातील अवैध वरली मटका व्यवसाय बंद करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

अमरावती – बडनेरा शहरात सध्या उघडपणे चालणाऱ्या अवैध वरली मटका व्यवसायामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, या व्यवसायाविरोधात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होत नसल्याने संतप्त नागरिकांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालय गाठले.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील ठराविक चौकांमध्ये उघडपणे मटका सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, त्याचा त्रास परिसरातील युवकांवर आणि समाजावर वाईट परिणाम करत आहे. यामुळे वैतागलेले नागरिक पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी हा व्यवसाय तात्काळ बंद करण्याची मागणी केली.

पोलीस आयुक्तांचा तात्काळ प्रतिसाद
नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी तक्रार करणाऱ्या नागरिकांना सोबत घेऊनच संबंधित ठिकाणी जाऊन अवैध मटका व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले.

कारवाईची अंमलबजावणी महत्त्वाची
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशांनंतर या अवैध धंद्यावर नियंत्रण येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. स्थानिक नागरिकांची एकच मागणी आहे की, या व्यवसायावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, जेणेकरून समाजातील तरुण पिढी भरकटू नये.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button