citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात दुचाकी चोराला अटक; तहसीलमधील वाहनचोरीचा गुन्हा उघड

गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ ची कारवाई; १० हजार रुपये किमतीची बजाज प्लॅटिना जप्त

नागपूर : नागपूर शहरातील वाहनचोरीच्या प्रकरणाचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ ने उलगडा केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी भूषण कृष्णाजी घागरे (वय ३४, रा. साईनगर ढाबा, वाडी पोलीस ठाणे हद्द, नागपूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीची बजाज प्लॅटिना दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत वाहनचोरीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाला आरोपीबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भूषण घागरे याला ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरीचे वाहन हस्तगत केले.

जप्त करण्यात आलेल्या बजाज कंपनीच्या प्लॅटिना दुचाकीचा क्रमांक एमएच ४० एएच १७२५ असून, तिची अंदाजे किंमत १० हजार रुपये आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला तहसील पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाने केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button