Accident NewscitynewsMaharashtraNagpurPolice

ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी, चालक वाहनासह पसार

गोधनी–झिंगाबाई टाकळी मार्गावरील अपघात; संतप्त नागरिकांनी रस्ता रोखला, कठोर उपाययोजनांची मागणी

नागपूर : मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोधनी–झिंगाबाई टाकळी मार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. अश्विनी फलके असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात त्यांचे पती पंकज फलके यांनाही दुखापत झाली आहे. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतप्त नागरिकांनी रस्ता रोखून धरत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी ठोस आणि कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या मार्गावरील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button