अमरावतीत ५० ते ५५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू; मृतदेहाची ओळख पटविण्याचे राजापेठ पोलिसांचे आवाहन

फरशी स्टॉप परिसरातील कावरनगर रोडवर आढळला मृतदेह; उजव्या हातावर ‘केशव दास, झाशी’ असे गोंदलेले
अमरावती : शहरातील फरशी स्टॉप परिसरातील कावरनगर रोडवर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे असल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह आढळल्यानंतर नागरिकांच्या मदतीने संबंधित व्यक्तीला उपचारासाठी अमरावती येथील इर्विन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८४/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनानंतर अमरावती येथील शवागृहात ठेवण्यात आला आहे.
मृत व्यक्तीचे वर्णन
- वय : अंदाजे ५० ते ५५ वर्षे
- शरीरयष्टी : सडपातळ
- उंची : अंदाजे ५ फूट
- रंग : सावळा
- केस व दाढी-मिशी : काळे-पांढरे
- विशेष खूण : उजव्या हातावर केशव दास, झाशी असे गोंदलेले आहे.
- कपडे : निळ्या रंगाचे शर्ट आणि काळ्या रंगाची लोअर पँट
ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन
या वर्णनातील व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास किंवा त्यांच्या नातेवाईकांची ओळख पटत असल्यास तात्काळ राजापेठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संपर्क :
- राजापेठ पोलीस ठाणे : ०७२१-२६७२०१०
- पोलीस उपनिरीक्षक वैभव पानसरे : ८९७५०२२८००
- पोलीस हवालदार मुकेश परचाके : ७७४३८५७१९८
अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राजापेठ पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सिटी न्यूज | अमरावती



