citynewsLatest NewsMaharashtraNagpur gramin

बैलवाड्यात डीपीचा विजेचा धक्का लागून माकड गंभीर जखमी; ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण

वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल; जखमी माकडावर प्राथमिक उपचार

बैलवाडा : येथील महावितरणच्या वीज वितरण रोहित्रावर (डीपी) चढलेल्या एका माकडाला विजेचा जोरदार धक्का बसल्याची घटना घडली. या दुर्घटनेत माकड गंभीर जखमी झाले. मात्र, स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने मदतीसाठी धाव घेतल्याने माकडाचे प्राण वाचवण्यात यश आले.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते लुकेश भडंग यांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधून जखमी माकडाबाबत माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे पथक तातडीने बैलवाड्याकडे रवाना झाले. जखमी माकडावर प्राथमिक उपचार करून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

ग्रामस्थांनी दाखवली तत्परता

या बचावकार्यात माजी सरपंच सचीन शेटे, इंद्रजित भडंग, छत्रपाल जुमडे, गुड्डू भडंग, पिंटू नागपुरे, गुड्डू शेटे, मंगेश ठाकरे, कैलास गिरी, अक्षय ठाकरे आणि निलेश जुमडे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

ग्रामस्थांनी वेळीच मदत केल्याने आणि वनविभागाने तातडीने प्रतिसाद दिल्याने जखमी माकडाला उपचार मिळू शकले. स्थानिक नागरिकांच्या या तत्परतेचे परिसरातून कौतुक होत आहे.

सिटी न्यूज | बैलवाडा

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button