citynewsMaharashtraNagpur

नागपूर जिल्ह्यातील बोरवेल खोदकामावरील बंदी उठवा; नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी

मशीनरीचे हप्ते भरणे कठीण; व्यावसायिकांसह कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर

नागपूर जिल्ह्यात बोरवेल खोदकामावर घालण्यात आलेल्या बंदीमुळे बोरवेल व्यावसायिक आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही बंदी उठवून व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नागपूर जिल्ह्यात बोरवेल खोदकामावरील बंदीचा फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने केली आहे. या बंदीमुळे बोरवेल व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांच्या आर्थिक अडचणी वाढत असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.

बोरवेल खोदकामासाठी व्यावसायिकांनी कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी केली असून, त्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणेही कठीण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. व्यवसाय ठप्प झाल्याने या क्षेत्रातील कामगारांच्या रोजगारावरही परिणाम होत आहे. परिणामी, व्यावसायिकांसह त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कामगारांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून बोरवेल खोदकामावरील बंदीबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची विनंती केली आहे. बंदीचा फेरविचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी आणि बोरवेल व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button