Accident NewsAmravati GramincitynewsDhamangaonLatest NewsMaharashtra

धामणगावात भीषण अपघात; सद्गुरू ऑटोमोबाईलचे संचालक अंकित उर्फ नानू गोडबोले यांचा मृत्यू

गांधी चौकातील स्टेट बँकेसमोर मध्यरात्री अपघात; रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी केले मृत घोषित

धामणगाव रेल्वे | प्रतिनिधी संतोष वाघमारे

धामणगाव रेल्वे येथील सद्गुरू ऑटोमोबाईलचे संचालक अंकित उर्फ नानू गोडबोले यांचा बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे धामणगाव रेल्वे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे १ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास धामणगाव रेल्वे येथील गांधी चौक परिसरात, स्टेट बँकेसमोर चारचाकी वाहनाचा अपघात झाला. या अपघातात अंकित उर्फ नानू गोडबोले यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर त्यांना तातडीने धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी दखल घेतली असून, या अपघाताचा पुढील तपास दत्तापूर पोलीस करीत आहेत. अपघात नेमका कसा घडला, याबाबत अधिक माहिती तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.

सिटी न्यूज | संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button