AmravatiAmravati PolicscitynewsCrime News

गोडाऊनमधून इलेक्ट्रिक साहित्य चोरी; चार जण ताब्यात

गुन्हे शाखेची कारवाई; ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

अमरावती : शहरातील गोडाऊनमधून इलेक्ट्रिक साहित्य चोरी करणाऱ्या चार जणांना अमरावती शहर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गोडाऊनमधील चोरीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी अमित अशोक सोमाणी, वय ४५ वर्षे, रा. बियाणी चौक, अमरावती यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार दि. ०९ सप्टेंबर २०२६ ते १२ सप्टेंबर २०२६ दरम्यान बडनेरा टेकडीजवळील त्यांच्या गोडाऊनमध्ये काही अज्ञात इसमांनी प्रवेश करून २० नग सीलिंग फॅन आणि १२ नग गिझर, असा एकूण सुमारे १ लाख ६ हजार रुपयांचा इलेक्ट्रिक साहित्याचा मुद्देमाल चोरून नेला होता.

या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८१/२०२६, कलम ३०५, ३३१(८) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखा, युनिट क्रमांक ०१, अमरावती शहर येथील अधिकारी व अंमलदारांनी समांतर तपास करून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून चोरीचा काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  1. अभिषेक उर्फ टोबो आनंदीलाल साहू, वय २५ वर्षे, रा. संतोषी नगर, साहू वाडा, अमरावती.
  2. दिपक ओमप्रकाश राजकवार, वय ३८ वर्षे, रा. रत्नगंज, झाडपीपुरा, अमरावती.
  3. दिपक गजानन ठोबरे, वय ३० वर्षे, रा. रत्नगंज, झाडपीपुरा, अमरावती.
  4. प्रविण शंकरराव ढोके, वय ३० वर्षे, रा. रत्नगंज, झाडपीपुरा, अमरावती.
  • नवीन गिझर – १ नग : अंदाजे ३,९०० रुपये
  • नवीन सीलिंग फॅन – १२ नग : अंदाजे २८,६०० रुपये
  • एकूण जप्त मुद्देमाल : ३२,५०० रुपये

ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या कारवाईत गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार सहभागी होते. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button