AmravaticitynewsFestival News

बडनेरा मार्गावर बाप्पांच्या मूर्तींची रेलचेल

आकर्षक मूर्तींनी सजली दुकाने; खरेदीसाठी भक्तांची मोठी गर्दी

अमरावती : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील बडनेरा मार्गावर गणपती बाप्पाच्या आकर्षक मूर्तींची दुकाने सजली आहेत. घराघरात बाप्पांच्या स्थापनेची तयारी सुरू झाली असून, आपल्या आवडत्या गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी या मार्गावर पाहायला मिळत आहे.

यंदा गणपतीच्या मूर्तींवर आकर्षक कलाकुसर आणि सुंदर रंगकाम करण्यात आले असून, विविध आकार, रूप आणि आकर्षक सजावटीतील मूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. घरातील गणपतीची स्थापना सुंदर आणि आकर्षक पद्धतीने करण्यासाठी नागरिकांकडून विविध मूर्तींची पाहणी करून पसंतीच्या मूर्तीची निवड केली जात आहे.

विशेष म्हणजे केवळ अमरावती शहरातीलच नव्हे, तर वाशिम जिल्ह्यातील नागरिकदेखील गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी बडनेरा मार्गावर येत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच या परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गणपती बाप्पाला आपल्या घरी विराजमान करण्यासाठी भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मूर्ती खरेदीसोबतच घरगुती सजावट आणि गणेशोत्सवाच्या तयारीलाही वेग आला आहे. दरम्यान, बडनेरा मार्गावर मूर्ती खरेदीसाठी आलेल्या भक्तांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जात असून, यंदाच्या गणेशोत्सवाबाबत नागरिकांमध्ये विशेष उत्साह असल्याचे चित्र आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button