वल्लभनगरात वृक्षारोपण अभियान; दर रविवारी वृक्षारोपणाचा संकल्प

श्री हनुमान युवक मंडळाचा पुढाकार; परिसरात ५० हून अधिक रोपांची लागवड, पर्यावरण संवर्धनाचा संदेश
अमरावती | प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धन आणि परिसर हरित करण्याच्या उद्देशाने श्री हनुमान युवक मंडळ, हनुमान मंदिर, वल्लभनगर, अकोली रोड, अमरावती यांच्या वतीने वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत परिसरात ५० हून अधिक रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत दर रविवारी नियमितपणे वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे कार्य सुरू ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून अॅड. प्रशांत देशपांडे आणि अमरावतीचे समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया (लप्पीभैया) उपस्थित होते. मान्यवरांनी स्वतः वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी श्री हनुमान युवक मंडळाच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विनोद गोळे, अतुल बोरेकर, राजू काळे, संदीप ठाकरे, मनोहर तिवसकर, पंकज देऊळकर, वासुदेव कामनापुरे, राहुल माटोडे, रामकृष्ण भोयर, राजेश चिमोटे, रविभाऊ कळसकर, नरेश पाटमासे, शंकरराव काष्टे, सुभाष भाऊ खंडागळे, वैभव खरड, राजूभाऊ पांडे, नांदुरकर काका, नंदकिशोर पेटकर, मकवाने राऊत आणि नंदू घुमडे यांची उपस्थिती होती.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा सहभाग
या उपक्रमात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनीही सहभाग नोंदवला. यावेळी आशिष सुंठवाल, निषादसिंह जोध, विकास मारोडकर, करण धोटे, शुभम कामनापुरे, शाश्वत बोंडे, सुमित मारोडकर, यश सगणे, दीपक येलगवार, अमोल विजयकर, राहुल कामनापुरे, शुभम देशमुख, रवी पंझडे, वैभव पाचडे, ऋषी फणसे आणि चैतन्य उपाध्ये उपस्थित होते.
दर रविवारी वृक्षारोपणाचा संकल्प
पर्यावरण संवर्धन हे केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता दर रविवारी नियमितपणे वृक्षारोपण अभियान राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. अधिकाधिक रोपांची लागवड करण्यासोबतच लावलेल्या रोपांची योग्य देखभाल करण्यावरही भर देण्यात येणार आहे.
परिसर हिरवाईने नटविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार स्वयंसेवकांनी व्यक्त केला. तसेच समाजात वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला.
वृक्षारोपणासोबतच लावलेल्या रोपांचे संगोपन करणे तितकेच महत्त्वाचे असून, नागरिकांनीही पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.



