Uncategorized
नांदेडमध्ये भीषण अपघात | अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर ते तामसा जाणाऱ्या मार्गावरील चेनापूर शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत भीषण अपघात झाला.
या अपघातात हदगाव तालुक्यातील वानवडी येथील पांडुरंग खूपसे, वय ३५ वर्षे, यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेली आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, फरार वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.



