नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या नवनियुक्त विदर्भाध्यक्ष ॲड. आनंद परचुरे यांची समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया (लप्पीभैया) यांच्याकडे सदिच्छा भेट

अमरावती : नूतन विदर्भ शिक्षण मंडळाचे नवनियुक्त विदर्भाध्यक्ष ॲड. आनंद परचुरे यांनी अमरावती येथील ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया उर्फ लप्पीभैया यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी लप्पीभैया यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.
या भेटीदरम्यान शिक्षण क्षेत्राचा विकास, सामाजिक उपक्रम, युवकांचे सक्षमीकरण तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजहितासाठी एकत्रितपणे कार्य करण्याबाबतही सकारात्मक विचारांची देवाणघेवाण झाली.
यावेळी नूतन विदर्भ शिक्षण मंडळ, अमरावतीचे हितेश व्यास, अतुल बिजगरे, अनिरुद्ध कराडे, स्वप्नील सनय, निनाद साने, ॲड. क्षितिज धुंदी, अमित जाजोदिया तसेच अनिकेत जोशी हे विशेष उपस्थित होते.
कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला. उपस्थितांनी ॲड. आनंद परचुरे यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.



