AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

ट्रान्सपोर्ट नगरातील मिनी कचरा कंपोस्ट डेपोविरोधात एमआयएमचे आंदोलन

डेपो तातडीने स्थलांतरित करण्याची मागणी; महापालिका प्रशासन व कचरा संकलन कंपनीविरोधात घोषणाबाजी

प्रतिनिधी

महानगरपालिका क्षेत्रातील ट्रान्सपोर्ट नगर येथे उभारण्यात आलेल्या मिनी कचरा कंपोस्ट डेपोच्या विरोधात एमआयएमच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आंदोलन केले. डेपो परिसरात निषेध नोंदवत आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासन आणि कचरा संकलन करणाऱ्या कोणार्क कंपनीविरोधात घोषणाबाजी केली तसेच डेपो तातडीने अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी केली.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, या कंपोस्ट डेपोमुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि संभाव्य आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून हा डेपो त्वरित हटवून योग्य पर्यायी ठिकाणी स्थलांतरित करावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी एमआयएमच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या भावना आणि स्थानिकांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही दिला.

दरम्यान, या आंदोलनानंतर महापालिका प्रशासन किंवा संबंधित कचरा संकलन कंपनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

या आंदोलनानंतर महापालिका प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते आणि मिनी कचरा कंपोस्ट डेपोबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button