citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrimeYavatmal

यवतमाळमध्ये लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

पोलिसांची धडक कारवाई; अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर चर्चांना उधाण

प्रतिनिधी

राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिबंधित गुटखा विक्री आणि तस्करीविरोधातील कारवायांना वेग आला आहे. अशातच यवतमाळ शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ शहरातील नंदुरकर शाळेसमोरील पळसवाडी सिंधी कॅम्प परिसरात राहणारा कुमार नावाचा व्यक्ती मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याची साठवण आणि तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे डीबी पथकाने संबंधित घरावर छापा टाकला. कारवाईदरम्यान लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक करत आहे.

दरम्यान, शहरात अशी चर्चा सुरू आहे की, प्रतिबंधित गुटख्याविरोधात अपेक्षित कारवाई अन्न व औषध प्रशासनाकडून होत नसल्याने पोलिसांनाच पुढाकार घ्यावा लागला. मात्र, या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

यवतमाळमधील या कारवाईनंतर प्रतिबंधित गुटखा तस्करीच्या साखळीबाबत आणखी कोणते खुलासे होतात आणि संबंधित विभागांकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button