Amaravti GramincitynewsCrime NewsDhamangaonLatest NewsMaharashtra

धामणगाव रेल्वेत अल्पवयीन मुलीची फसवणूक; लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार, पीडिता गरोदर

धामणगाव रेल्वे परिसरातून एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यात आले आणि त्यातून पीडित मुलगी गरोदर राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने पोक्सो कायद्यासह गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

धामणगांव रेल्वेच्या दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दीतील या प्रकरणात 32 वर्षीय आरोपी तरुणावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित अल्पवयीन मुलीमध्ये ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले होते.


याच दरम्यान आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत पीडितेचा विश्वास संपादन केला आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हे प्रकार 21 फेब्रुवारी 2026 ते 20 मे 2026 या कालावधीत वारंवार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


दरम्यान, पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघड झाले. कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर दत्तापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


या प्रकरणात BNS कलम 64(2)(m), 65(1) तसेच IPC 376 आणि पोक्सो कायदा कलम 4 व 6 अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास दत्तापूर पोलीस करत असून आरोपीच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे.

अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. कायद्याच्या कडक तरतुदी असूनही अशा घटना घडणे ही गंभीर बाब आहे. पोलिस तपासातून पुढे कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे आता

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button