BusinessIndia NewsLatest News
सोनं १ हजारांनी तर चांदी ४ हजारांनी स्वस्त; ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी

सराफा बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली असून सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. सोन्याचे दर तब्बल १ हजार रुपयांनी कमी झाले आहेत, तर चांदीच्या दरात ४ हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आजच्या घसरणीनंतर जीएसटीसह सोन्याचे दर १ लाख ६१ हजार १९५ रुपयांवर आले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह २ लाख ७६ हजार ४० रुपये इतके नोंदवले गेले आहेत. काही दिवसांपासून सातत्याने वाढणारे दर आता पुन्हा जैसे थे पातळीवर आल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे.
दर घसरल्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः आगामी विवाह सोहळे आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सराफा व्यावसायिकांमध्येही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.



