citynewsLatest NewsMaharashtraNagpur

ऑपरेशन थंडरला मोठे यश! नागपुरात ३४ किलो गांजा जप्त; सहा आरोपी जेरबंद

नागपूर : शहर पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या “ऑपरेशन थंडर” मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत तब्बल ३४ किलो गांजा जप्त केला असून सहा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एकूण २९ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१४ मे २०२६ रोजी सायंकाळी अंमली पदार्थ विरोधी पथक नागपूर शहरात गस्त घालत होते. त्यावेळी उमिया कॉम्प्लेक्ससमोर, शिव मंदिराजवळ भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत एक अशोक लेलँड कंटेनर ट्रक आणि स्वीफ्ट डिझायर कारमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी तत्काळ दोन्ही वाहनांना ताब्यात घेऊन पंचासमक्ष झडती घेतली. या झडतीदरम्यान दोन्ही वाहनांतून एकूण ३४ किलो गांजा जप्त करण्यात आला.

या प्रकरणात सय्यद सुमेल सय्यद इस्माईल, मोहम्मद अनस सय्यद हिदायतुल्ला, रवि उदयसिंग शाहू, अनिकेत गजानन गायनेर, अमन निमराज गायधने आणि आकाश संजय विठोले या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी आरोपींकडून ३४ किलो गांजा, ८ मोबाईल फोन, एक अशोक लेलँड कंटेनर ट्रक आणि एक स्वीफ्ट डिझायर कार असा एकूण ₹२९.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्राथमिक चौकशीत हा गांजा ओडिशातील संभलपूर येथील बिजयकुमार बहेरा याच्याकडून आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक फायद्यासाठी हा गांजा नागपुरात विक्रीसाठी आणण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही संपूर्ण कारवाई नागपूर शहर पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button