citynewsCrime NewsIndia NewsLatest News

धावत्या ट्रेनमध्ये महिलेशी गैरवर्तन; पाहत असल्याचा जाब विचारताच तरुणीला थप्पड, व्हायरल व्हिडिओवर संताप

धावत्या ट्रेनमधील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ट्रेनमधील एका प्रवाशाने महिलांकडे संशयास्पद नजरेने पाहत असल्याचा आरोप करत काही तरुणींनी त्याला जाब विचारला. मात्र या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाले आणि संबंधित पुरुष प्रवाशाने एका तरुणीला थप्पड मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओनुसार, काही तरुणींनी ट्रेनमधील वरच्या बर्थवर झोपलेल्या एका पुरुष प्रवाशाला त्यांच्याकडे सतत पाहत असल्याचा आरोप केला. “अडीच तासांपासून का बघत आहात?” असा सवाल करत तरुणींनी त्याला जाब विचारला. सुरुवातीला केवळ शाब्दिक वाद सुरू असताना काही क्षणांतच वातावरण तणावपूर्ण झाले.

व्हिडिओमध्ये दिसते की, संबंधित पुरुष प्रवासी खाली उतरतो आणि उत्तर देण्याऐवजी चित्रीकरण करणाऱ्या तरुणीला अचानक थप्पड मारतो. यानंतर तरुणी संतापाने ओरडताना दिसते — “मला मारलं… हात कसा लावला? थप्पड कशी मारली?” या घटनेनंतर डब्यात एकच खळबळ उडाली.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी रेल्वे मंत्रालय, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे प्रशासनाला टॅग करत आरोपीवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

सोशल मीडियावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया देत, “महिलांनी फक्त प्रश्न विचारला म्हणून मारहाण? ही अत्यंत धक्कादायक बाब आहे,” असे म्हटले आहे. काहींनी डब्यात उपस्थित इतर प्रवाशांनी हस्तक्षेप का केला नाही, असा सवालही उपस्थित केला आहे.

या घटनेमुळे रेल्वेतील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून सार्वजनिक वाहतुकीत महिलांना सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी प्रशासनाचीच असल्याची भावना व्यक्त होत आहे. आरोपीची ओळख पटवून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button