Amaravti GraminAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

महिला आरक्षणावरून राजकीय संघर्ष तीव्र; वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल

अमरावती : राज्यात महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले असून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली.

पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी काँग्रेस पक्षाने नेहमीच काम केले आहे. महिला आरक्षणाचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकाळातच जाहीर करण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला.

भाजपवर टीका करताना त्यांनी म्हटले की, भाजपची विचारसरणी मनुवादी असून महिलांच्या आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. तसेच महिला आरक्षणाचा संबंध ‘डी-लिमिटेशन’ म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेशी असल्याचे सांगत, भाजप मुद्दाम जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

याशिवाय, काँग्रेस महिला आरक्षणाला विरोध करत असल्याचे चुकीचे चित्र निर्माण करून भाजप काँग्रेसची बदनामी करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महिला आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष पुढे कोणते वळण घेतो आणि जनतेसमोर नेमके सत्य काय येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button