citynewsCrime NewsIndia NewsLatest News

संशयातून पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला; कापलेला पाय घेऊनच पती पोलीस ठाण्यात पोहोचला

आंध्र प्रदेशातील पाल्नाडू जिल्ह्यातून एक अंगावर काटा आणणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला आणि तिचा एक पाय शरीरापासून वेगळा केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हल्ल्यानंतर आरोपी कापलेला पाय हातात घेऊन थेट पोलीस ठाण्यात गेला आणि आत्मसमर्पण केले.

ही घटना मुप्पल्ला मंडलममधील थोंडपी गावात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीला पत्नीच्या वर्तनाबद्दल संशय होता. गुरुवारी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर संतापाच्या भरात आणि मद्यधुंद अवस्थेत आरोपीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, महिलेचा एक पाय शरीरापासून वेगळा झाला.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेची मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत.

दरम्यान, आरोपी हल्ल्यानंतर थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याच्या हातात पत्नीचा कापलेला पाय पाहून पोलीसही हादरले. आरोपीने स्वतः गुन्ह्याची कबुली देत आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button