Amaravti GraminAmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

परतवाडा-अचलपूर प्रकरणावर अल्पसंख्याक आयोगाचा कठोर पवित्रा; विशेष पथक करणार चौकशी

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-अचलपूर परिसरात समोर आलेल्या कथित व्हिडिओ प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात आतापर्यंत समोर आलेल्या काही व्हिडिओंची पोलिसांकडून पडताळणी सुरू असून, संबंधित पीडित तरुणी अल्पसंख्याक समाजातील असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर भूमिका घेतली आहे. परतवाडा-अचलपूर परिसरातून आयोगाकडे या संदर्भात अधिकृत तक्रार प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.

प्यारे खान यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आयोगाचे एक विशेष पथक लवकरच परतवाडा-अचलपूर परिसराला भेट देणार आहे. हे पथक स्थानिक प्रशासन, पोलीस अधिकारी आणि संबंधित नागरिकांशी चर्चा करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

अल्पसंख्याक आयोगाने प्रशासनाकडे या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “महिलांच्या सन्मानाशी संबंधित अशा गंभीर घटनांकडे दुर्लक्ष होऊ नये. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे,” असे प्यारे खान यांनी म्हटले.

तसेच, या संवेदनशील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर समाजात शांतता आणि सलोखा कायम राखण्याचे आवाहनही आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे. “न्याय मिळावा, पण त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा तणाव किंवा अफवांना बळी पडू नये,” असे आवाहन प्यारे खान यांनी केले.

दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींचे मोबाईल, सोशल मीडिया व्यवहार आणि इतर संपर्कांची चौकशी केली जात आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button