citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpur

नागपूरात क्रिकेट सट्टा रॅकेटवर पोलिसांचा मोठा घाव… ४० लाखांची रोकड जप्त, ४ आरोपी अटकेत!

नागपूर शहरात क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध जुगारावर छापा टाकत तब्बल ४० लाखांची रोकड जप्त करण्यात आली असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयटी पार्कजवळील लोखंडे नगर परिसरातील सिद्धांत सक्षम अपार्टमेंट येथे ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ ने सापळा रचत हा अड्डा उघड केला.

या कारवाईत अमन पाठक, आकाश गुहिल, श्रेयस लांजेवार आणि मुशीर अहमद या चार आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी आरोपींकडून ४० लाखांची रोकड, महागडे मोबाईल आणि विविध बँक खात्यांची पासबुक जप्त केली आहेत. एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ४३ लाख ९२ हजार रुपये इतकी आहे.

तपासादरम्यान आरोपी अमन पाठक याच्या भाड्याच्या फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. ही रक्कम क्रिकेट सट्ट्याद्वारे बेकायदेशीररीत्या मिळवण्यात आल्याचे समोर आले आहे.

आरोपी बनावट युजर आयडी, पासवर्ड आणि भाड्याने घेतलेल्या बँक खात्यांच्या माध्यमातून ऑनलाईन बेटिंग चालवत होते. या मार्गाने त्यांनी शासनाचा कर चुकवत मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचेही उघड झाले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

“नागपूर पोलिसांची ही धडक कारवाई म्हणजे ऑनलाईन जुगारावर मोठा आळा मानला जात असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे… या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button