citynewsLatest NewsMaharashtraNanded

नांदेडमध्ये डीजे मुक्त आंबेडकर जयंती मिरवणूक… परंपरा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश!

आज देशभरात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये एक आगळीवेगळी, डीजे मुक्त आणि पारंपरिकतेचा वारसा जपणारी भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

देशभरात विविध ठिकाणी आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असताना, नांदेडमध्ये फुले-शाहू-आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने ही विशेष मिरवणूक आयोजित करण्यात आली. या मिरवणुकीची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे—ध्वनीप्रदूषण टाळत पूर्णपणे डीजे मुक्त स्वरूपात पारंपरिक कलांना प्राधान्य देण्यात आले.

मिरवणुकीत बंजारा समाजाचे पारंपरिक नृत्य, आदिवासी समाजाचा प्रसिद्ध तारपा नृत्य, तसेच लेझीम आणि ढोल पथकांनी वातावरण भारावून टाकले. रंगीबेरंगी वेशभूषा, पारंपरिक वाद्ये आणि कलाकारांचा उत्साह यामुळे मिरवणूक अधिकच आकर्षक ठरली.

नांदेडकरांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मिरवणुकीतून सामाजिक एकता, संस्कृती जपण्याचा संदेश आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला.

“नांदेडमधील ही डीजे मुक्त मिरवणूक केवळ उत्सव नाही… तर संस्कृती, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचा जिवंत संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button