Uncategorized
भर रस्त्यात महिलेने एका व्यक्तीला संपवलं, नाशिक येथे घटनेचा व्हिडीओ समोर

नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.
विल्होळी परिसरात एका महिलेकडून एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेचा एक थरारक व्हिडिओ देखील समोर आला असून, त्यामध्ये संबंधित महिला हातात कोयता घेऊन त्या व्यक्तीवर वार करताना दिसत आहे.
माहितीनुसार, महिलेने त्या व्यक्तीच्या डोक्यावर सपासप वार केले.
हत्येनंतर आरोपी महिला एका साथीदारासोबत दुचाकीवरून पळून गेली.
ओळख पटू नये यासाठी दुचाकीच्या नंबर प्लेटवर कपडा झाकण्यात आला होता.
या हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, नाशिक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.
या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



