Accident NewsAmaravti GraminAmravaticitynewsDhamangaon

अमरावतीत भीषण अपघात – ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगरूळ दस्तगीर रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

मृत व्यक्तीचे नाव शेख मुस्ताक (वय ५५, रा. पेठ रघुनाथपूर, मंगरूळ दस्तगीर) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते आपल्या दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना मंगरूळ दस्तगीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच मंगरूळ दस्तगीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

👉 एक क्षणाची निष्काळजीपणा आयुष्यभराची हानी ठरू शकते… वाहन चालवताना नियमांचे पालन आणि सतर्कता अत्यावश्यक आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button