Amaravti GraminAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

‘सिटी न्यूज’चा इम्पॅक्ट! प्रभाग ७ मधील घाण उघड होताच प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

अमरावती : शहरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी ‘सिटी न्यूज’ने सुरू केलेल्या ‘हेल्थ चेकअप’ मोहिमेचा पहिल्याच दिवशी जबरदस्त परिणाम पाहायला मिळाला आहे. प्रभाग क्रमांक ७ मधील विदारक परिस्थिती समोर आणताच झोपलेले प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

सिटी न्यूजच्या टीमने गाडगेनगर ते शेगाव नाका दरम्यान पाहणी केली असता, फुटपाथवर कचऱ्याचे ढीग साचलेले दिसले. परिसरातील चारही कचरा कुंड्या ओसंडून वाहत होत्या, तर रस्त्यावर कचरा विखुरलेला होता. या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.

ही बातमी प्रसारित होताच मनपाच्या स्वच्छता विभागात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही मनपा प्रशासन आणि कोणार्क कंत्राटदाराचे कर्मचारी तातडीने कामाला लागले.

तात्काळ २ ते ३ ट्रक कचरा त्या ठिकाणाहून हटवण्यात आला. या कारवाईनंतर आता सफाई कामगारांमध्येही धास्ती निर्माण झाली असून, “सिटी न्यूज येण्यापूर्वीच काम पूर्ण करायचं” अशी भावना दिसून येत आहे.

‘हेल्थ चेकअप’ मोहिमेचा हा पहिल्याच दिवसाचा मोठा परिणाम मानला जात असून, नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

शहराच्या विकासाच्या गप्पा मारणारे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गप्प बसले असताना, ‘सिटी न्यूज’ जनतेचा आवाज बनून पुढे येत आहे. तुमच्या परिसरातही अशाच समस्या असतील, तर सिटी न्यूजशी संपर्क साधा — तुमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button