Chhatrapati Sambhaji NagarcitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

करमाड हादरले! पेट्रोल पंपावरच पत्नीचा निर्घृण खून — नवऱ्यानेच गळा चिरला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड येथे अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेट्रोल पंपावर काम करत असताना एका महिलेची तिच्याच पतीने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार (९ एप्रिल) दुपारी साडेबाराच्या सुमारास करमाड येथील गणपती मंदिराशेजारी असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर ही घटना घडली. पूजा सुदाम गावंडे (वय २७) या आपल्या कामात व्यस्त असताना, तिचा पती सत्यम रावसाहेब गावंडे याने अचानक चाकूने तिच्यावर हल्ला केला.

या भीषण हल्ल्यात पूजाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असून, या हत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

ही घटना केवळ गुन्हा नसून समाजाला हादरवणारी आहे. दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

📺 अशाच धक्कादायक घडामोडींसाठी पाहत राहा — सिटी न्यूज

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button