अमरावतीत ‘आदर्श शिक्षक’ांचा सन्मान… सीमा सहेर शेख अफझल यांचा गौरव!

अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या “भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श शिक्षक” पुरस्काराने यंदा उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्र. ०८ (जमील कॉलनी) येथील शिक्षिका श्रीमती सीमा सहेर शेख अफझल चौधरी यांना सन्मानित करण्यात आले आहे.
या गौरवास्पद कामगिरीनिमित्त आज अमरावती महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा माजी महापौर विलासभाऊ इंगोले यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
श्रीमती सीमा सहेर यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महानगरपालिकेने त्यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरविले.
👉 याशिवाय त्यांना —
✔️ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून “पोस्ट ऑफ द मंथ” पुरस्कार
✔️ उर्दू वाचन अभियान ३.० (सिम्पोजियम २०२६) अंतर्गत जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक
असे अनेक सन्मानही मिळाले आहेत.
यावेळी बोलताना विलासभाऊ इंगोले म्हणाले,
“शिक्षक हा समाजाचा कणा असतो. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या सीमा सहेर यांसारख्या शिक्षिका समाजासाठी प्रेरणादायी आहेत.”
या सत्कार सोहळ्याला नगरसेवक, समाजसेवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी सीमा सहेर यांच्या यशाबद्दल अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
👉 हा सन्मान केवळ एका शिक्षिकेचा नाही… तर संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण ठरतोय!



