Amaravti GraminAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत ‘किसान न्याय सत्याग्रह’ची सुरुवात… युवक काँग्रेस आक्रमक!

अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आजपासून “किसान न्याय सत्याग्रह” आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. अमेरिकेसोबत करण्यात आलेला करार रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी युवक काँग्रेसने हा लढा उभारला आहे.

या आंदोलनाच्या प्रारंभप्रसंगी भारतीय युवक काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्र सहप्रभारी नवज्योत सिंग संधु यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच प्रदेश उपाध्यक्ष व विभाग प्रभारी अनुराग भुयार, जिल्हाध्यक्ष राहुल येवले, कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगळे, अमरावती प्रभारी अक्षय हेटे, प्रदेश महासचिव निलेश गुहेउत्कर्ष देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

याशिवाय वैभव देशमुख, नितिन काळे, संकेत कुलट (NSUI प्रदेश उपाध्यक्ष), सर्वेश खांडे (NSUI अध्यक्ष), निलेश डांगे, आशीष यादव, श्रीनेत राऊत, सागर देशमुख (तालुका अध्यक्ष), सर्वेश बर्वे, शुभम बांबल, ऋषिकेश वाढोकर आदी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

👉 शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

👉 आता या सत्याग्रहाला प्रशासन कसा प्रतिसाद देणार आणि आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button