Amaravti GraminAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

धारणीतील ‘जुगाड’ की निष्काळजीपणा? रस्त्याच्या कामासाठी सोलर खांबच आडवा टाकला — प्रशासनावर सवाल

अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरात पुन्हा एकदा अजब-गजब कारभार समोर आला आहे. रस्त्याच्या कामासाठी ‘काम सुरू आहे’ असा फलक लावण्याऐवजी चक्क सोलर लाईटचा खांब उपडून रस्त्याच्या मध्ये आडवा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धारणी शहरातील पोस्ट ऑफिस रोडवर सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. अशा वेळी नागरिकांना सतर्क करण्यासाठी सूचना फलक लावणे अपेक्षित असते. मात्र, संबंधित ठेकेदाराने नियम धाब्यावर बसवत वेगळाच ‘जुगाड’ केला. सूचना फलकाऐवजी सोलर पॅनलसह संपूर्ण खांब उपटून तोच रस्त्याच्या मध्ये अडथळा म्हणून टाकण्यात आला.

या प्रकारामुळे दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत —
👉 सार्वजनिक मालमत्तेची अशी उधळपट्टी का केली जाते आहे?
👉 आणि याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे?

दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. कारण अशा निष्काळजीपणामुळे कधीही अपघात होऊ शकतो. विशेषतः रात्रीच्या वेळी हा अडथळा अधिक धोकादायक ठरू शकतो.

धारणीतील हा प्रकार केवळ हास्यास्पद नसून, तो प्रशासनाच्या निष्काळजी आणि बेफिकीर कारभाराचे उदाहरण ठरत आहे. आता या प्रकरणी जबाबदारांवर कारवाई होणार का, की पुन्हा एकदा याकडे दुर्लक्ष होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📺 अशाच स्थानिक घडामोडींसाठी पाहत राहा — सिटी न्यूज

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button