‘मिसिंग’ प्रकरणाचा थरारक उलगडा; सक्करधरा हद्दीत वृद्धाची हत्या

नागपूर : सक्करधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बेपत्ता प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक वळण समोर आले आहे. सुरुवातीला ‘मिसिंग’ वाटणारे हे प्रकरण प्रत्यक्षात खूनाचे असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ताहिर शेख उर्फ राशिद शेख (वय अंदाजे ६५ वर्षे) हे अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी सक्करधरा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. सुरुवातीला ही एक सामान्य बेपत्ता केस मानली जात होती. मात्र, पोलिसांना संशय आल्याने तपासाची दिशा बदलण्यात आली.
तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला असून, ताहिर शेख यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलिसांनी पठाण उर्फ अजहर (वय २६) या संशयित आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या कडक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. काही कारणांमुळे झालेल्या वादातूनच आरोपीने वृद्धाची हत्या केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रश्न कायम…
‘मिसिंग’ प्रकरणातून खुनाचा उलगडा झाल्याने पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत असले, तरी अशा घटना थांबणार कधी? हा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा – City News



