citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपुरात खळबळ! मेट्रो स्टेशनजवळ जिवंत स्फोटकांचा साठा आढळला

नागपूर : देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीए रोडवरील दोसर भवन चौक परिसरात, मेट्रो स्टेशनच्या शेजारील एका घराच्या आवारात जिवंत स्फोटकांचा मोठा साठा आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी पोलिसांना ‘संशयास्पद बॅग’ असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांसह बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बॅगची तपासणी करताच सर्वजण थरारले.

या बॅगेतून तब्बल १५ जिलेटीन कांड्या, ५८ डिटोनेटर आणि ८ कनेक्टर असा अत्यंत धोकादायक स्फोटक साठा आढळून आला. या स्फोटकांमुळे कोणत्याही क्षणी मोठा अनर्थ घडू शकला असता.

धक्कादायक बाब म्हणजे, ही बॅग मागील एक ते दीड महिन्यांपासून त्या ठिकाणी पडून असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी जिलेटीन कांड्या बाहेर दिसू लागल्याने घरमालकाला संशय आला आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी अत्यंत दक्षता घेत सर्व स्फोटके जप्त करून सुरक्षित ठिकाणी हलवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

तपास सुरू, कटकारस्थानाचा संशय
मेट्रो स्टेशनसारख्या संवेदनशील ठिकाणाजवळ स्फोटके सापडल्याने हा केवळ योगायोग नसून गंभीर बाब असल्याचे मानले जात आहे. ही स्फोटके नेमकी कोणी आणि कशासाठी ठेवली, याचा पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

नागपूरसह राज्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा – City News

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button