Accident NewsDhuleLatest News

धुळे–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, आईला भेटायला निघालेल्या तरुणींची डंपरखाली चिरडून मृत्यू

धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दसेगाव फाट्याजवळ एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. आईला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या दोन तरुणींना भरधाव डंपरने मागून जोरदार धडक दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगावकडून रहिपुरीकडे जात असताना डंपर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की डंपरने दोन्ही तरुणींना काही अंतर फरपटत नेल्याची माहिती समोर येत आहे.

या भीषण अपघातात २१ वर्षीय चंचल लांडगे हिचा जागीच मृत्यू झाला असून, तिची मैत्रीण वैष्णवी चौधरी ही गंभीर जखमी झाली आहे. जखमी वैष्णवीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अपघातानंतर डंपर चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे महामार्गावरील बेफिकीर व वेगवान वाहनचालकांविरोधात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button