AmravatiCrime NewsLatest News

भानखेडा अत्याचार प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी

अमरावती शहरातील भानखेडा मार्गावरील १८ वर्षीय युवतीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

२८ मार्च रोजी अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भानखेडा मार्गावर ही धक्कादायक घटना घडली होती. एका १८ वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाचही आरोपींना अटक केली होती. अटक केल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सुरुवातीला २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, पोलिसांनी या काळात आरोपींची सखोल चौकशी केली. २ एप्रिल रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या सर्व आरोपींना सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणात लवकरच आरोपींची ओळख परेड होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे अमरावती शहरात संतापाचे वातावरण असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

या प्रकरणात पुढे आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button