citynewsLatest NewsMaharashtraNashik

अशोक खरात प्रकरणात नवी खळबळ; रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत असून या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष तसेच महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अशोक खरात यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वेग आला होता. दरम्यान, आज (सोमवार) चाकणकर या विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. यामुळे या प्रकरणात आणखी खळबळ उडाली आहे.

तपास यंत्रणांकडून आज खरातच्या मोबाईल फोनमधील डेटाची सखोल छाननी करण्यात येत आहे. कॉल रेकॉर्ड, चॅट्स, मेसेजेस तसेच आर्थिक व्यवहार यांची तपासणी प्राधान्याने सुरू असून त्यातून नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

मोबाईलमधील विविध संपर्कांच्या आधारे तपास अधिक गतीने पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू असून, पुढील काही तासांत या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button