citynewsInternational NewsLatest News

‘नो किंग्स डे’ निमित्त अमेरिकेत ट्रम्पविरोधात जोरदार आंदोलन; हजारो नागरिक रस्त्यावर

वॉशिंग्टन (प्रतिनिधी):
अमेरिकेत ‘नो किंग्स डे’ निमित्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्यात आले. देशभरात हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला.

न्यूयॉर्कसह अनेक प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या न्यूयॉर्क शहरात हजारो आंदोलक एकत्र आले होते. या आंदोलनात ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डी नीरो यांनीही सहभाग घेत ट्रम्प यांच्यावर तीव्र टीका केली. त्यांनी ट्रम्प यांना “स्वातंत्र्य आणि सुरक्षेसाठी धोका” असल्याचे म्हटले.

अटलांटा ते सॅन डिएगोपर्यंत देशभर विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. अलास्कामधील नागरिकांनीही आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलकांनी ट्रम्प यांच्या कथित हुकूमशाही शैली, कडक स्थलांतर धोरणे आणि इराणसोबतच्या युद्धावर नाराजी व्यक्त केली.

या आंदोलनामुळे अमेरिकेतील राजकीय वातावरण तापले असून, आगामी काळात या मुद्द्यांवरून संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button