India NewsLatest NewsMaharashtra

रामनवमीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात उसळी; खरेदीदारांसाठी महत्त्वाचा सल्ला

रामनवमीच्या शुभमुहूर्तावर देशभरात सोनं आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सणासुदीमुळे ज्वेलरीची मागणी वाढल्याने बाजारात तेजीचं वातावरण निर्माण झालं आहे.आज, 26 मार्च 2026 रोजी, दिल्लीच्या बुलियन मार्केटमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,46,830 रुपयांवर पोहोचला आहे. तर मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, पुणे आणि बंगळुरूमध्ये हा दर सुमारे 1,46,680 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवण्यात आला आहे.चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, आज चांदीचा भाव 2,50,100 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. दिल्ली बाजारात चांदीत तब्बल 11,250 रुपयांची वाढ दिसून आली आहे.दरम्यान, आज सकाळी रामनवमी निमित्त कमोडिटी मार्केटचं पहिलं सत्र बंद राहणार असून, संध्याकाळी 5 वाजता ट्रेडिंग पुन्हा सुरू होऊन रात्री 11:30 पर्यंत चालणार आहे.जागतिक स्तरावर भू-राजकीय तणाव, महागाईची शक्यता आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे सोनं सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय ठरत आहे. तसेच चांदीलाही औद्योगिक मागणी आणि गुंतवणूकदारांची पसंती मिळत आहे.तज्ञांच्या मते, सोनं खरेदी करताना केवळ दर पाहू नये. मेकिंग चार्ज, जीएसटी आणि इतर खर्च लक्षात घेणे गरजेचे आहे. गुंतवणुकीसाठी 22 किंवा 24 कॅरेट हॉलमार्क असलेले गोल्ड बार किंवा नाणी खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरू शकते.दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं फायदेशीर असलं तरी विक्रीसाठी योग्य वेळ निवडणं तितकंच महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button