citynewsLatest NewsLocal NewsMaharashtraNanded

नांदेडमध्ये पेट्रोलसाठी झुंबड; पंप बंद, सुरू असलेल्या पंपांवर तुफान गर्दी

नांदेड जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल टंचाईसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मुदखेड तालुक्यातील बारड येथे इंधनासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साठा संपल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश पेट्रोल पंप रात्री आठ वाजताच बंद करण्यात आले. त्यामुळे सुरू असलेल्या बारड येथील पेट्रोल पंपावर नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली आहे.

विशेष म्हणजे, शेतकरी तब्बल ५० ते ६० किलोमीटर अंतरावरून डिझेल घेण्यासाठी येथे येत आहेत. ट्रॅक्टरसाठी डिझेल भरण्यासाठी कॅनच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठीही वाहनधारकांची मोठी गर्दी होत आहे.

दरम्यान, “पेट्रोल मिळणार नाही” अशा अफवांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधन पुरवठा खंडित झाल्याच्या अफवांनीही जोर धरला आहे. मात्र, प्रत्यक्षात अचानक वाढलेल्या मागणीमुळे साठा संपल्याची माहिती समोर येत आहे.

पेट्रोल पंप प्रशासनाकडून सकाळपासून पुरवठा पूर्ववत होईल, असे सांगितले जात असले तरी नागरिकांचा त्यावर विश्वास बसताना दिसत नाही. एकूणच नांदेडमध्ये इंधनटंचाईपेक्षा अफवांचा परिणाम अधिक दिसून येत असून, आता प्रशासन परिस्थिती कशी हाताळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button