Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest NewsLocal NewsMaharashtramelghatMorsi Warud

मोर्शीत ‘स्कॅट अ‍ॅनालिसिस रिसर्च लॅब’चे उद्घाटन; वन्यजीव अभ्यासासाठी महत्त्वाचे पाऊल

मोर्शी येथील भारतीय महाविद्यालय मध्ये ‘स्कॅट अ‍ॅनालिसिस रिसर्च लॅब’ची स्थापना करण्यात आली असून, वन्यजीव अभ्यासासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे.

अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन डॉ. मिलिंद बारहाते यांच्या हस्ते पार पडले.

या प्रयोगशाळेमध्ये मांसाहारी वन्य प्राण्यांच्या आहाराचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. प्राण्यांच्या विष्ठेच्या (स्कॅट) विश्लेषणातून त्यांच्या अन्नसाखळी, सवयी आणि ऋतूनुसार होणारे बदल यांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वन्यजीव संशोधनाची प्रत्यक्ष संधी मिळणार असून, संशोधनाची आवड निर्माण करण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंत सोमवंशी उपस्थित होते. तसेच डॉ. ओमप्रकाश मुंडे, सलील चिंचमलातपुरे आणि डॉ. संतोष आगरकर यांचीही उपस्थिती लाभली.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची जिज्ञासा वाढवणे आणि वन्यजीव संवर्धनासाठी योगदान देणे हा आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी पार पडला.

मोर्शीतील ही प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी संशोधनाची नवी दालने उघडणारी ठरणार असून, वन्यजीव संवर्धनासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button