Accident NewsInternational NewsLatest News

कोलंबियात भीषण विमान अपघात; १२५ सैनिकांपैकी ६६ ठार, बचावकार्य सुरू

कोलंबियामधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोलंबिया हवाई दलाचे C-130 हरक्यूलिस हे मालवाहू लष्करी विमान सोमवारी भीषण अपघातग्रस्त झाले. या विमानात एकूण १२५ सैनिक प्रवास करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान प्यूर्टो लेगुइजामो येथून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच कोसळले. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली, ज्यामुळे बचावकार्य अधिक कठीण झाले.

या दुर्घटनेत आतापर्यंत ६६ सैनिकांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातग्रस्त विमान मानवी वस्तीपासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर कोसळल्याने मोठी जीवितहानी टळली.

घटनेनंतर कोलंबियाच्या सैन्यदलात एकच खळबळ उडाली असून बचाव पथकांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. स्थानिक प्रशासन, लष्कर आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, या भीषण अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून संपूर्ण देशातून शोक व्यक्त केला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button