City CrimecitynewsCrime NewsLatest NewsLocal NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूरमध्ये ऑडी कारमधून अवैध विदेशी दारू जप्त; १२.९४ लाखांचा मुद्देमाल, एक आरोपी ताब्यात

नागपूर शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत लक्झरी कारमधून सुरू असलेली अवैध विदेशी दारूची वाहतूक उघडकीस आणली आहे. दिघोरी चौक परिसरात नाकाबंदी दरम्यान ही कारवाई करण्यात आली.

हुडकेश्वर पोलीस ठाणे च्या तपास पथकाने पांढऱ्या रंगाच्या ऑडी कारची तपासणी केली असता, कारमधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एकूण १२ लाख ९४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणात प्रविण वसंतराव कूरेवार याला ताब्यात घेण्यात आले आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस पथक पेट्रोलिंगवर असताना गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक पपीन रामटेके आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

नागपूर पोलिसांची ही कारवाई अवैध दारू व्यवसायाविरोधात मोठं पाऊल मानलं जात असून, अशा कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button