नागपूरमध्ये ९ वर्षीय मुलीवर अत्याचार; पारडी पोलिसांची तत्काळ कारवाई, आरोपी अटकेत

नागपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या ९ वर्षांच्या निष्पाप मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘पांडे’ नावाचा व्यक्ती या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो मागील काही वर्षांपासून संबंधित परिसरात राहत होता. घटनेची माहिती मिळताच पारडी पोलीस ठाणे च्या डीबी पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, अधिक माहिती गोळा करण्यात येत आहे.
अल्पवयीन मुलांवरील वाढत्या गुन्ह्यांमुळे समाजात गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. ही घटना नागपूरकरांना हादरवून सोडणारी असून, अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.



