नागपूरमध्ये शिक्षिकेवर अत्याचाराचा आरोप; सोशल मीडियावरून ओळख झालेल्या आरोपीला अटक

नागपूर शहरात एका महिला शिक्षिकेवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरून झालेली ओळख, त्यानंतरचे प्रेमसंबंध आणि मग विश्वासघात करत अत्याचार केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता ही खासगी शाळेत कार्यरत असून तिची आरोपीसोबत ओळख Instagram या माध्यमातून झाली होती. पुढे ही ओळख प्रेमसंबंधात बदलली. मात्र, पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपीने विश्वास संपादन करून तिच्यावर अत्याचार केला.
घटनेची माहिती मिळताच पारडी पोलीस ठाणे च्या डीबी पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव तिलक रे असे असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाचा तपास पीएसआय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, आरोपीचा पूर्व इतिहासही तपासला जात आहे. याआधीही अशा प्रकारचे गुन्हे त्याच्याकडून झाले आहेत का, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.
या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावरील ओळखी किती धोकादायक ठरू शकतात, याचे हे उदाहरण असल्याची चर्चा सुरू आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.



