Latest NewsWashimWeather Report

वाशिममध्ये उन्हाचा कडाका; उसाच्या रसाला मागणी वाढली

वाशिम शहर सध्या उन्हाच्या तडाख्याने अक्षरशः हैराण झालेलं, दिवसभर वाढणारं तापमान आणि त्यातून दिलासा मिळवण्यासाठी नागरिकांचा कल थंड पेयांकडे वाढतोय यामध्ये सर्वात जास्त मागणी आहे — नैसर्गिक आणि ताजेतवाने करणाऱ्या उसाच्या रसाला, शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या रसवंतीगृहांवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत ग्राहकांची सतत वर्दळ पाहायला मिळते. कोणी कामाच्या मध्ये थांबून रस घेतोय, तर कोणी कुटुंबासोबत थंडगार उसाचा रस एन्जॉय करताना दिसतोय. मात्र या वाढत्या मागणीसोबतच दरातही वाढ झालेली दिसते. मागील वर्षी 10 रुपयांना मिळणारा उसाच्या रसाचा एक ग्लास यंदा 15 ते 20 रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तरीही ग्राहकांची संख्या कमी झालेली नाही. कारण उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी उसाचा रस हा सर्वात स्वस्त आणि नैसर्गिक पर्याय मानला जातो. रस विक्रेत्यांच्या मते, उसाच्या दरात वाढ, वाहतूक खर्च आणि इतर खर्च वाढल्यामुळे दर वाढवावे लागले आहेत. एकीकडे उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे थंडगार उसाचा रस…वाशिममध्ये सध्या हेच चित्र पाहायला मिळत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button