अमरावतीत सनरे सोलरचा भव्य डीलर मेळावा; सोलर क्षेत्रात नव्या संधींचा मार्ग मोकळा

अमरावती, प्रतिनिधी :
अमरावती शहरात सोलर क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल टाकत कोसोल कंपनीच्या सनरे सोलर ब्रँडतर्फे भव्य डीलर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात डीलर्स, विक्रेते आणि ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सोलर क्षेत्रातील नव्या प्रोडक्ट्स आणि संधींबाबत माहिती घेतली.
कोसोल कंपनीद्वारे संचालित सनरे सोलर ब्रँड गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात कार्यरत असून अमरावतीतही या ब्रँडने आपली ठळक ओळख निर्माण केली आहे. सोलर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कंपन्यांमध्ये कोसोल कंपनीचा समावेश होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
शुक्रवार, २० मार्च रोजी बडनेरा रोडवरील हॉटेल विरसा येथे या भव्य डीलर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला कंपनीचे CEO नितीन सांगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मनीष पेठकर, सागर देवताळे, विनय भोयते, आशिष पेठे, कार्तिकया साखरकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर CEO नितीन सांगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत कंपनीच्या विविध सोलर प्रोडक्ट्सची माहिती दिली. तसेच सोलर ऊर्जेचे महत्त्व, भविष्यातील व्यवसायिक संधी आणि बाजारपेठेतील वाढीचे मार्ग यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.
कार्यक्रमादरम्यान सोलर क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, ग्राहकांना मिळणारे फायदे आणि बदलती बाजारपेठ यावरही चर्चा करण्यात आली. या मेळाव्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, डीलर्स व विक्रेत्यांसाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
एकंदरीत, कोसोल कंपनीच्या या उपक्रमामुळे अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात सोलर क्षेत्राच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
कोसोल कंपनीच्या या डीलर मेळाव्यामुळे सोलर क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असून, पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वाटचाल अधिक वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे.



